Wed, Jul 17, 2019 16:00होमपेज › Satara › ‘पुढारी एज्यु’मुळे मिळाली नवी दिशा 

‘पुढारी एज्यु’मुळे मिळाली नवी दिशा 

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:44PMसातारा: प्रतिनिधी

सलग तीन दिवस चाललेल्या ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनामुळे अनेक शंकांचे निरसन झाले असून करिअरच्या नव्या दिशा मिळाल्या, अशा भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांसह पालकांचेही चेहरे खुलले. रविवारी या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी तर अवघे पोलिस करमणूक केंद्र विद्यार्थी व पालकांनी ओसंडून वाहिले. त्यांनी या उपक्रमाबाबत भरभरून बोलताना या प्रदर्शनामुळे खर्‍या अर्थाने शैक्षणिक पर्वणी लाभल्याचे सांगितले. 

संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ पुणे, असोसिएट्स स्पॉन्सर्स विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे, को-स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठवाडा मित्रमंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ शैक्षणिक प्रदर्शन पार पडले. सलग तीन दिवस विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक पंढरीचा अनुभव या प्रदर्शनस्थळी आला. 

‘पुढारी एज्यु दिशा’ या शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. सलग तीन दिवसांमध्ये झालेली  नामवंत तज्ञांची व्याख्याने आणि विविध स्टॉल्सवर मिळालेली बहुमोल माहिती यामुळे विद्यार्थी व पालकांमधील शैक्षणिक प्रवेशाच्यादृष्टीने असलेली संभ्रमावस्था दूर झाली. याबाबत पालक व विद्यार्थ्यांनी ‘पुढारी’ला धन्यवाद दिले. 

तीन दिवसांत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मेडिकल आणि इंजिनिअरिंग, करिअर गाईडन्स, कायदा क्षेत्रातील संधी, प्रवेश व शुल्क नियोजन कायदा, एम. बी. ए मधील करिअर संधी, कला क्षेत्रातील करिअर संधी, हॉटेल व्यवसायातील संधी, एमपीएससी व युपीएससी या स्पर्धा परीक्षा, अ‍ॅटोमेशनलमधील करिअर संधी, व्यावसायिक शिक्षणाचे आजच्या जगातील महत्व आणि बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंगमधील संधी या विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध शैक्षणिक स्टॉल्सद्वारे कोणी इन्स्टिट्यूट अथवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यावा, याची इंत्यभूत माहितीही विद्यार्थ्यांना मिळाली. 

प्रवेशासंदर्भात असणार्‍या अनेक शंका कुशंकांना ‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये पूर्णविराम मिळाला. विविध नामवंतांच्या व तज्ञांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला आवश्यक असलेली माहिती पालक आणि विद्यार्थी ‘नोट डाऊन’ करत होते. त्याचबरोबर मान्यवरांचे व्याख्यान झाल्यानंतर त्या क्षेत्राबद्दल असणारे प्रश्‍न विचारत होते. संबंधित लेक्चररकडून पालकांना अपेक्षित अशी उत्तरे मिळाल्यामुळे त्यांचे समाधान होत होते. त्यावरून हा उपक्रम नागरिकांनी किती डोक्यावर घेतला याची प्रचिती आली. 

‘पुढारी’च्या शैक्षणिक प्रदर्शनात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील नामांकित शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स होते. नामवंत  शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली परिपूर्ण माहिती मिळाल्याचे पालकांनी आवर्जून नमूद केले. 

सहभागी संस्था 

प्रायोजक  :- संजय घोडावत युनिर्व्हसिटी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट सातारा , सूर्यदत्ता गु्रप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे, मराठवाडा मित्र मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे, एमआयटी पुणे,  ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी पुणे, सिम्बायसिस स्कील ओपन युनिर्व्हसिटी पुणे, कॅनरा बँक, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ  टेक्नॉलॉजी इस्लामपूर, कृष्णा फौंडेशन कराड, दिशा अ‍ॅकॅडमी वाई, इन्फिनिटी अ‍ॅनिमेशन  इन्स्टिट्यूट सातारा, डीकेटीई इचलकरंजी, क्रेझी क्रिऐशन अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट सातारा, व्हिक्टर अ‍ॅकॅडमी सातारा, दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज कराड, देवकर क्लासेस सातारा, शिवाजी युनिर्व्हसिटी, तात्यासाहेब  कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.