Wed, Jul 08, 2020 18:44होमपेज › Satara › सातारा : मोदींच्या सभेची जय्यत तयारी अंतिम टप्यात

सातारा : मोदींच्या सभेसाठी जय्यत तयारी

Last Updated: Oct 17 2019 1:33AM
सातारा : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकिय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. साताऱ्यात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जोरदार चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे. गुरुवारी दुपारी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून ही अंतिम टप्प्यात आली आहे. येथे बुधवारी सायंकाळपर्यंत भव्य मंडप उभारून येणाऱ्या नागरिकांसाठी खुर्च्या लावण्याचे काम सुरू होते. दरम्यान, साताऱ्यात विधानसभे बरोबरच लोकसभा पोटनिवडणूक होत असून मोदी काय बोलणार? याकडे साताऱ्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे गेल्या ४ दिवसापासून इतर जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्तासाठी साताऱ्यात मागविण्यात आले आहेत. यामुळे शहराला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अनुशंगाने सुमारे साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तवर राहणार आहे. या सभेसाठी सुमारे एक लाख लोक येणार असल्याचा दावा भाजप कडून केला जात आहे.