Fri, Apr 26, 2019 17:31होमपेज › Satara › कराड : प्रातांच्या आदेशाला केराची टोपली (व्हिडिओ)

कराड : प्रातांच्या आदेशाला केराची टोपली (व्हिडिओ)

Published On: Jan 24 2018 12:34PM | Last Updated: Jan 24 2018 12:34PMकराड : प्रतिनिधी

अतिक्रमणे काढण्याबाबत दोन वर्षापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशास अक्षरश: केराची टोपली दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आगाशिवनगर (मलकापूर) येथील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण पाटील यांनी या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

ढेबेवाडी फाटा परिसरातील पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतचे फूटपाथ आणि कराड - ढेबेवाडी मार्गालगतच्या फूटपाथवरील अतिक्रमणे काढण्यासाठी दोन वर्षापूर्वी, २८ जानेवारी २०१६ रोजी कराडचे तत्कालीन प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प अभियत्यांना अतिक्रमण हटवण्याचा लेखी आदेश दिला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई अद्यपही झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही प्रांताधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळेच कारवाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तसेच महामार्ग देखभाल अधिकाऱ्यांकडून आजवर केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.