Tue, Nov 20, 2018 13:16होमपेज › Satara › सातारा : मराठा आरक्षणासाठी लोणंदमध्ये भव्य मोर्चा (Video)

सातारा : मराठा आरक्षणासाठी लोणंदमध्ये भव्य मोर्चा (Video)

Published On: Aug 10 2018 12:12PM | Last Updated: Aug 10 2018 12:12PMलोणंद : प्रतिनिधी

 मराठा समाजाचे वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या लोणंद बंदला नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या वतीने लोणंद गावातून भव्य मोर्चा काढण्यात आला. तर लोणंद - खंडाळा रस्तावरील बाजार तळावर रास्ता रोको केला.जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी लोणंद नगरी दुमदुमुन गेली. या रॅली मध्ये मोठया प्रमाणावर लोणंद व परिसरातील गावातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

लोणंद पंचक्रोशीतील  मराठा समाजाच्यावतीने लोणंद बंद , रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता राजमाता अहिल्यादेवी स्मारकापासून निघालेल्या मोर्चाने झाली. अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर लोणंद शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या वेळी जय शिवाजी जय भवानी, एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. या मोर्चामध्ये मोठया प्रमाणावर समाज बांधव सहभागी झाले. होते. मोर्चा बाजार तळावर आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.

लोणंद बंदमध्ये सहभागी होत सकाळपासुनच बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे दैनदिन व्यवहार बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता. लोणंद गावातील व्यापारी ही या बंद मध्ये सहभागी झाले होते.

शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपअधिक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे पो.नि. प्रकाश सावंत, शिरवळ पो.नि. भाऊसाहेब पाटील, सपोनि गिरिश दिघावकर, सोमनाथ लांडे, हनुमंत गायकवाड व पोलास, एसआरपी कमांडोनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.