होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्तांचे प्रजासत्ताकदिनी सामुहिक मुंडण

प्रकल्पग्रस्तांचे प्रजासत्ताकदिनी सामुहिक मुंडण

Published On: Jan 20 2018 4:06PM | Last Updated: Jan 20 2018 4:05PMकराड : प्रतिनिधी

चाळीस वर्षापूर्वी कण्हेर धरणामुळे कराड तालुक्यात विस्थापित करण्यात आलेल्या वाघेश्वर, चिंचणी, पिंपरी, कवठे आणि केंजळ इ. गावातील प्रकल्पग्रस्त प्रजासत्ताकदिनी कराड प्रांत कार्यालयासमोर सामुहिक मुंडण करून निषेध व्यक्त करणार आहेत.    

पुनर्रवसनानंतर या पाच गावांना शासनाकडून कोणत्याही सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत असा या गावांतील लोकांचा आरोप आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनादिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने याबाबत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

आज (शनिवार) याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी कराड प्रांताधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत महसूल प्रशासनाला निवेदन दिले.