होमपेज › Satara › खासगी सावकाराने शेतकर्‍याची जमिन विकली

खासगी सावकाराने शेतकर्‍याची जमिन विकली

Published On: Mar 15 2018 8:55PM | Last Updated: Mar 15 2018 8:55PMकराडः प्रतिनिधी 

३० हजारांच्या मोबदल्यात तब्बल १४ लाखांची परतफेड करूनही खासगी सावकाराने एका शेतकर्‍याची जमीन तिघांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार जिंती (ता. कराड) परिसरात घडला असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सावकाराविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी सरिता हणमंत खराडे यांनी तक्रार दिली असून, या तक्रारीवरून नांदगाव (ता. कराड) येथील सावकाराविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. सरिता खराडे यांच्या सासू आजारी पडल्या होत्या. त्यावेळी खराडे यांनी सावकाराकडून ३० हजार रूपये घेतले होते. १५ टक्के व्याजाने घेतलेल्या या पैशाच्या मोबदल्यात खराडे कुटुंबियांनी त्या सावकाराला तब्बल १४ लाख रूपयांची परतफेड केली आहे. मात्र त्यानंतरही कर्ज बाकी असल्याचे सांगत सावकाराने खराडे यांची जमीन नांदगाव, रेठरे बुद्रूकसह सैदापूर या ठिकाणच्या तिघांना विकली.