Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Satara › अमेरिकेतील विद्यापीठाकडून  आ. पृथ्वीराज चव्हाण निमंत्रित 

अमेरिकेतील विद्यापीठाकडून  आ. पृथ्वीराज चव्हाण निमंत्रित 

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 10:46PMकराड : प्रतिनिधी 

अमेरिकेतील केंब्रीज मॅसॅच्युसेटस या जगविख्यात विद्यापीठामध्ये रविवार, 8 एप्रिलला होणार्‍या एमआयटी इंडिया परिषद - 2018 मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. 

एमआयटी इंडिया परिषदेने 2011 सालापासून सरकार, ऊर्जा, अर्थकारण, तंत्रज्ञान, चित्रपट, प्रसारमाध्यमे तसेच उद्योग यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मते जागतिक पातळीवर आणण्याचे काम अविरतपणे सुरु ठेवले आहे. यंदाची परिषद अमेरिकेतील केंब्रीज, मॅसॅच्युसेटस या जगविख्यात विद्यापीठामध्ये होणार आहे. यावर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय विविध क्षेत्रातील कल्पक उपक्रम हा असून, परिषदेत भारतातील संशोधक आणि विचारवंत सहभागी होणार आहेत. ते भारतामध्ये अर्थिक, सामाजीक व तांत्रिकदृष्ट्या होणारे बदल यावर दृष्टीक्षेप टाकणार आहेत. 

या परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे सार्वजनिक धोरणामधील अग्रणी व कल्पक उपक्रम या विषयावर संबोधीत करणार आहेत. त्यांच्याबरोबर भारतामधून आशिष चौहान (मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, बीएसई  पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज), अनंत नारायण (मुख्य कार्यकारी अधिकारी, मिंतरा), गुरुराज देशपांडे (संस्थापक देशपांडे फाउंडेशन) व रेखा मेनन (एक्सेंचर इंडियाचे अध्यक्ष व वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक) आदी मान्यवर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती आ. पृृथ्वीराज चव्हाण 
यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.