Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Satara › पंतप्रधान आज जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी बोलणार 

पंतप्रधान आज जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी बोलणार 

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 11:18PMसातारा : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील 15 लाभार्थ्यांशी मंगळवार दि. 5 जून रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे लाभधारकांना पंतप्रधानांशी थेट बोलण्याची संधी मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 5 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत  घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे पत्र केंद्र शासनाच्यावतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झाले असल्याची माहिती प्रकल्प संचालक नितीन थाडे यांनी दिली.  त्यानुसार सातारा जिल्ह्यातील हलिमा सय्यद, जैतुबी बराण (रा. पिंपळोशी ता. पाटण), बाणुबी नदाफ (रा. काले ता. कराड), मुसावली जमखिंडवाले (रा. भोेसे. ता.कोरेगाव), सुनिता पवार (रा. मणदुरे ता. पाटण), लक्ष्मीबाई झाडे (रा. जांभळी ता. वाई), शालिनी पवार (रा. धामणेर, ता. कोरेगाव), रेश्मा दाभाडे (रा. म्हावशी, ता. पाटण),  शालन गायकवाड (रा. अतित, ता. सातारा), दगडु भिलारे (रा. जावली हारोशी, ता. महाबळेश्‍वर), सुशिला काटे (रा. बेलदरे, ता. कराड), विश्‍वास कदम (रा. बोरगाव, ता. कोरेगाव), गंगुबाई माळी (रा. खोडद, ता. सातारा), शालन निंबाळकर (रा. गोंदवले खुर्द ,ता. माण), कमल गायकवाड (रा. खोजेवाडी, ता. सातारा)  यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधणार आहेत. या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती असून हे लाभार्थी पारंपरिक वेशभुषेत उपस्थित राहणार आहेत. या लाभार्थ्यांना  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ओळखपत्र पुरविण्यात आली आहेत. व्हिडीओ कॉन्फरसिंगपुर्वी लाभधारकाची मानसिकता आनंददायी राहील, यासाठी  लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे थाडे यांनी सांगितले.