Fri, Nov 16, 2018 13:14होमपेज › Satara › पोलिसाच्याच दुचाकीची चोरी

पोलिसाच्याच दुचाकीची चोरी

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:15PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले पोलिस सुनील सर्जेराव सावंत (वय 51, रा. सातारा) यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. चोरी ही घटना सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस हवालदार सुनील सावंत हे जिल्हा न्यायालयात कार्यरत आहेत. दि. 6 रोजी सकाळी ते न्यायालयात आल्यानंतर स्वत:ची दुचाकी पार्कींगमध्ये पार्क केली. दुपारी दीड वाजता पाहिल्यानंतर दुचाकी पार्कींगमध्ये उभी होती. सहा वाजता न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर ते पार्कींगमध्ये गेले असता तेथे दुचाकी नव्हती. परिसरात सर्वत्र शोधल्यानंतरही दुचाकी नसल्याने अखेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली. दरम्यान, गेल्या चार वर्षांपूर्वी अशाचप्रकारे जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून पोलिसाची दुचाकी चोरी झाली होती व त्याच दुचाकीवर पुणे येथे बाँम्बस्फोट झाला होता.