Fri, Jul 19, 2019 05:32होमपेज › Satara › तडीपाराकडून पोलिसाला धक्‍काबुक्‍की 

तडीपाराकडून पोलिसाला धक्‍काबुक्‍की 

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 1:21AMवडूज : वार्ताहर

तडीपार असलेल्या जयवंत जाधवला पकडताना पोलिसाला धक्‍का देऊन त्याने पुन्हा पलायन केले. याबाबत त्याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वडूज बसस्थानकावर वडूज पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत असताना हद्दपार असलेला जयवंत जाधव हा मोटारसायकलवर फिरताना आढळून आला.

पोलिस कॉ. महेंद्र खाडे यांनी त्याच्याकडे हद्दपार असताना कोणाच्या परवानगीने  आल्याबाबत विचारपूस केली. त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तू पोलीस स्टेशनला चल, असे म्हणून   पोलिस कॉ. खाडे यांनी त्याची मोटारसायकल धरली असता त्याने खाडे यांना ढकलून देऊन तो पळून गेला. यामध्ये खाडे जखमी झाले. अवैद्य धंद्याप्रकरणी जयवंत जाधव रा. वडूज हा  तडीपार आहे. तपास पोलीस निरिक्षक यशवंत शिर्के  करत आहेत.