Thu, Jan 24, 2019 03:34होमपेज › Satara › धक्‍कादायक : सातार्‍यातील पालमध्ये पोलिसाला मारहाण

धक्‍कादायक : सातार्‍यातील पालमध्ये पोलिसाला मारहाण

Published On: Jan 07 2018 7:14PM | Last Updated: Jan 07 2018 7:14PM

बुकमार्क करा
उंब्रज : प्रतिनिधी

पाल (ता. कराड) येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसास दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार घडल्याने दिवसभर या घटनेची चर्चा होती.

अण्णाराव बाबुराव मारेकर असे मारहाण झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी विकास दादू नलवडे (वय ४५, रा. शहापूर ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उंब्रज  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  रविवारी दुपारी २ वाजता पाल येथे खंडोबा मंदिर परिसरातील चौकात विकास नलवडे याने लाल रंगाची बुलेट लावली होती. सदरची बुलेट कोणाची आहे? असा आवाज  बंदोबस्तासाठी असणारे वाहतूक पोलिस मारेकर यांनी दिला. त्यानंतर विकास नलवडे हे तेथे आले व बुलेट माझी असून ती मी बाजूला घेणार नाही असे म्हणत हवालदार मारेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.