Thu, Mar 21, 2019 23:43
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › फलटण : कत्तलखान्यावर छापा; बंदी कागदावरच, प्रत्यक्षात..

फलटण : कत्तलखान्यावर छापा; बंदी कागदावरच, प्रत्यक्षात..

Published On: May 16 2018 1:20PM | Last Updated: May 16 2018 1:21PMफलटण : प्रतिनिधी 

कुरेशी नगर फलटण येथील जुन्या कत्तलखान्यात पोलिसांनी अचानक छापा टाकला. यात २१ जनावरे व ७० ते ८० जनावरांची मुंडकी कत्तलखान्यात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुरेशी नगर येथील नगर पालिकेच्या शाळेच्या पाठीमागे कत्तलखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे,परिविक्षाधीन अधिकारी पवन बनसोड व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी आज पहाटे ४ वाजता अचानक छापा टाकला. या वेळी यातील एक संशयित आरोपी इम्तियाज महेबूब बेपारी रा.कुरेशी नगर फलटण व  इतर फरार संशयित आरोपी यांनी कत्तलखाना सुरु ठेवल्याचे समोर आले. स्वतःच्या फायद्याकरिता आपापसात संगनमत करून व बेकायदा व बिगर परवाना चालवलेल्या जुन्या कत्तलखान्यात ७० ते ८० गोवंशीय जातीच्या जनावरांची मुंडकी मिळून आली. तसेच २१ गोवंशीय जनावरे आढळून आली आहेत. त्यात गावठी गाई, खिलार गाई, जर्सी गाई व एक जर्सी बैल असे एकूण २१ जनावरे कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी डांबून ठेवली होती. ती ताब्यात घेऊन जाधववाडी ता.फलटण येथे ठेवली आहेत.

याबाबतची फिर्याद नितीन दिलीप चतुरे यांनी दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल केला आहे. जप्त केलेला जनावरांची  किंमत १ लाख दहा हजार इतकी आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी करीत आहेत.