Thu, Jun 20, 2019 06:56होमपेज › Satara › पोलिस उपनिरीक्षक तानाजी लावंड यांना राष्ट्रपती पदक

पोलिस उपनिरीक्षक तानाजी लावंड यांना राष्ट्रपती पदक

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:14PMखटाव : प्रतिनिधी  

दरुज ( ता. खटाव ) चे सुपुत्र आणि मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणार्‍या तानाजी लावंड यांना पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले.

पोलिस उपनिरिक्षक तानाजी लावंड गेली 38 वर्षे पोलिस दलात प्रामाणिक सेवा बजावत आहेत. मुंबई लायन्स आणि रोटरी क्लबकडून त्यांना पोलिस अंमलदार पदाने गौरविण्यात आले होते. पोलिस महासंचालक सन्मान पदकाचेही ते मानकरी ठरले होते. 

ऑगस्ट 2015 मध्ये तानाजी लावंड यांना भारत सरकारकडून राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. 

यावेळी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, पोलिस महासंचालक सतीश माथुर, पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर,  मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती पोलिस पदक मिळाल्याबद्दल लावंड यांचे दरुज ग्रामस्थांनी अभिनंदन केले.