Tue, Jul 23, 2019 04:16होमपेज › Satara › जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करा

जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करा

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:09PMढेबेवाडी : प्रतिनिधी

ढेबेवाडी विभागात राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो रुपये खर्च झाला. पण योजनेच्या मुळ उद्देशालाच सुरूंग लावून कृषी खात्याने जनतेला विश्‍वासात न घेता मनमानी पद्धतीने निकृष्ट कामे केल्याने टंचाईत वापरासाठी एक लिटरसुद्धा पाणी उपलब्ध होत नाही. भ्रष्टाचारयुक्त “जलयुक्त शिवार‘’ योजनेच्या बोगस कामाची चौकशी न झाल्यास एक जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यांनी दिला आहे.

ढेबेवाडी येथे  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित मोहिते म्हणाले, ढेबेवाडी विभागात सन 2015/16 पासून मार्च 2018 अखेर तीन वर्षात विभागातल्या जिंती, आंब्रुळकरवाडी (भोसगांव), रूवले, उधवणे, पाळशी, सळवे, सुतारवाडी (मालदन), काळगांव, आचरेवाडी, कोळगेवाडी, डाकेवाडी, कारळे, शिद्रुकवाडी, भिलारवाडी या गावांची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झाली आहे.

त्यासाठी शासनाने काही निकष व कार्यपद्धती घालून दिलेली आहे, त्या निकषाप्रमाणेच जलयुक्तची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.त्यानुसार कृषी खात्याच्या व संबधित अधिकार्‍यांनी त्या त्या गावातील शेतकर्‍यांची बैठक घेऊन माहिती द्यायची आहे. त्यानंतर स्थानिक शेतकरी व जबाबदार नागरिकांना बरोबर घेऊन शिवारफेरी घेऊन सर्व्हे करून पाणी अडविण्यायोग्य जागा निश्‍चित करावयाच्या, त्याचे जिओ टँगींग प्रमाणे फोटो घेऊन शासनाकडे पाठवायचे आहेत व मंजूरी घ्यायची, सामील ग्राम पंचायतीच्या ग्रामसभा घेऊन त्यात प्रस्तावाला मंजुरी घेणे अशा पद्धतीचा अवलंब करायचा आहे. मात्र यापैकी कोणत्याही बाबीची पुर्तता न करता कृषी खात्याने कामे केली आहेत ती अत्यंत निकृष्ट आहेत. 

पावसाळ्यात त्यात पाणी साठा होतो उघडीप झाली की पाणी आटते त्या बंधार्‍यात एक लिटरसुद्धा पाणी  मिळत  नाही. यातून मुळ उद्देश बाजुलाच. पैसा मात्र वाया जातो. याबाबत माहिती मागितल्यास दिली जात नाही, अपिल केल्यावरही माहिती मिळत नाही.जनतेचे भविष्य उध्वस्त करणार्‍या भ्रष्टअधिकार्‍यांची चौकशी करा, अन्यथा एक जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचेही मोहिते यांनी सांगितले . 

 

Tags : satara, satara news, Jalyukta Shivar work, Inquiry,