Tue, Jun 02, 2020 01:11
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › शिळेला १६६० सालचा इतिहास

भक्ती, शक्तीचे स्थान असणारे तारळेतील मंदिर 

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 9:11PMतारळे : एकनाथ माळी 

शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या तारळेतील वनारसे बंधूचे विठ्ठल मंदिर भक्ती व शक्तीचे साक्ष देत आहे.त्या मंदिरात असणार्‍या तारक शिळेवरुन तारळे हे नाव गावाला पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.आजही वनारसे कुटुंबातील आठवी पिढी ऐतिहासिक वारसा जपत आहे.

सन 1660 च्या आसपास रामनवमीदिवशी  वनारसे कुटुंबातील मलूबूवा वनारसे यांच्या वंशज सावित्रीबाई वनारसे या विठ्ठलाच्या मोठ्या भक्त होत्या.पावसाळ्याच्या दिवसात त्या नेहमीप्रमाणे नदिच्या किनारी गेल्या होत्या.कपडे धूत असताना त्या हरिनामात मग्न होत्या.त्यादरम्यान मुसळधार पाऊसाने नदीला महापूर आला.पण हरिनामात दंग असलेल्या सावित्रीबाई ज्या दगडावर बसल्या होत्या तो दगड पाण्यावर तरंगू लागला .ये-जा करणार्‍या गावकर्‍यांनी हे दृश्य बाघितले.व सावित्रीबाई व तो दगड तसाच उचलून त्यांच्या घरी आणला.तेव्हापासून ती तारकशिळा म्हणून ओळखली जाऊ लागली.

सुमारे तीनशे वर्षापूर्वी सावित्रीबाई यांचे वारसदार मलुबूवा वनारसे यांनी विठ्ठल मंदिराची उभारणी केली.आजही मंदिरामध्ये ती तारकशिळा आहे.गुरुनाम सुधा,श्रीकृष्ण लिलावर्ण व भक्ती सुधारस या ग्रंथात तारक शिळेचे वर्णन आढळते.मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम वर्षेभर साजरे केले जातात.सुमारे चाळीस वर्षापूर्वी विठ्ठल मंदिरामध्ये गुरुचरीत्र पारायण मंडळ व वनारसे कुटुबियांनी छोटेखानी दत्त मंदिर बांधले असून  तेथे त्यापासून गुरुचरित्र पारायण सुरु आहे.वनारसे कुटुंबियांकडून नुकतेच मंदिराच्या गाभार्‍याचे नुतनीकरण केले आहे.आजही वनारसे कुटुंबातील विजय वनारसे,चंद्रकांत वनारसे व सदाशिव वनारसे ही आठवी पिढी वारसा चालवत आहे.