Mon, Sep 24, 2018 17:04होमपेज › Satara › सातारा : पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी ; एकावर गुन्हा

सातारा : पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी ; एकावर गुन्हा

Published On: May 27 2018 8:42AM | Last Updated: May 27 2018 8:42AMओझर्डे : वार्ताहर 

उसने पैसे वेळेत देत नसल्याचा रागातून वेलंग (ता. वाई) येथील शेळी पालन व्यवसायिक संजय मारुती जाधव (रा. वेलंग, ता. वाई) याने श्रीकांत चंद्रशेखर मछले (रा. भिवडी, ता. वाई) याच्या घरी जाऊन शिवीगाळ केली.  पैशाची मागणी करु लागले असताना प्रकरण हात घाईवर आले असताना त्याचा राग सहन न झाल्याने संजय जाधव यांनी आपल्या गाडीतून पिस्‍तुल काढून  श्रीकांत मछले यांच्यावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. 

यावेळी मछले यांनी व्यवाहारातील राहिलेले पैसे दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भुईंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.