Mon, Nov 19, 2018 12:38होमपेज › Satara › लाच घेताना बरडचा लिपिक जाळ्यात

लाच घेताना बरडचा लिपिक जाळ्यात

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:05PMफलटण : प्रतिनिधी

घरकुल योजनेचा मूल्यांकन दाखला पंचायत समितीत पाठवण्यासाठी लाभार्थ्याकडून 5 हजारां ची लाच घेताना बरड ग्रामपंचायतीच्या लिपिकास  सातारा एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एसीबीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सहायकालाही अटक केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी, बरड ग्रामपंचायत लिपिक अनंत हरिभाऊ लंगुटे (वय 32, रा. लंगुटे वस्ती, बरड, ता. फलटण) याने लाभार्थ्याच्या पंतप्रधान आवास योजनेंंतर्गत घरकुल कामाचा मूल्यांकन दाखला फलटण पंचायत समितीत पाठवल्याच्या मोबदल्यात  5 हजारांची मागणी केली होती. हा    दाखला मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पैसे मागितले असून ते द्या म्हणजे तुमचा चेक काढला जाईल, असे लंगूटे याने सांगितले होते.

याबाबत सातारा  लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्यानंतर लंगुटे यास रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर त्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक फुल्लकुमार भोसले याचे नाव घेतल्याने त्यासही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कोणता अधिकारी लाभार्थ्यांचे पैसे लंगूटेमार्फत पैसे घेत होता, याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग घेत असून ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पंचायत समिती फलटण या ठिकाणाहून संबंधित प्रकरणी कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.