Wed, Nov 21, 2018 13:22होमपेज › Satara › फलटण उपनगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

फलटण उपनगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:12PMफलटण : प्रतिनिधी

फलटण उपनगराध्यक्षांनी सोमवारी सकाळी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा फलटण शहरात सुरू असून याबाबत उलटसुलट कारणे सांगितली जात आहेत.

नगरपालिकेतील कारभाराबाबत सत्ताधारी गटाचे नेतेही समाधानी नाहीत. त्यातच काही पदाधिकार्‍यांचा व सदस्यांचा हेकेखोर स्वभाव कारभार करताना मारक ठरत आहे. त्यातूनच अंतर्गत धूसफूस होवून उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा वरिष्ठांकडे सादर केला आहे.

हा राजीनामा मंजूर होणार की वरिष्ठ नेते संबंधितांच्या मनमानीला चाप लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी अंतर्गत वादविवादाला  कंटाळूनच पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिल्याची  जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.