Mon, Aug 26, 2019 01:30होमपेज › Satara › फलटण : कार झाडावर आदळून ५ जण ठार

फलटण : कार झाडावर आदळून ५ जण ठार

Published On: Apr 27 2018 3:42PM | Last Updated: Apr 27 2018 3:44PMफलटण : प्रतिनिधी

बरड, ता. फलटण येथे पुणे-पंढरपूर मार्गावर आज शुक्रवारी मोटारीच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जण ठार झाले. यामध्ये 3 लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  सोलापूरहून पुण्‍याच्या दिशेने चाललेली असेंट कार क्र. एमएच 14 बीसी-9480 ही शुक्रवारी दुपारी बरड गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर चालकाचा अचानक गाडीवरून ताबा सुटला, यामुळे ती कार रस्त्यालगत असणार्‍या झाडाला जाउन धडकली. या गाडीमध्ये  9 जण प्रवास करीत होते. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते. या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले. यामध्ये 3 अल्पवयीन मुले आणि महिलांचा समावेश आहे. तसेच 4 जण जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर जखमींना तात्काळ फलटण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करीत आहेत.

Tags : Phaltan ,pune, pandharpur, road on, car,accident, five people, killed