Fri, Mar 22, 2019 07:40होमपेज › Satara › तुमची श्रद्धा कोणावर हे सर्वांना माहिती : रामराजे नाईक-निंबाळकर

तुमची श्रद्धा कोणावर हे सर्वांना माहिती : रामराजे नाईक-निंबाळकर

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:15PMफलटण (प्रतिनिधी) :

आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हात पाय बांधलेत असे समजू नका. आमची श्रद्धा आमचे नेते व पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसतो. मात्र, तुमची श्रद्धा कोणावर आहे ते सर्वांना माहीत आहे, असा टोला विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खा. उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला. 

खा. उदयनराजे फलटण येथे खासगी दौर्‍यावर आले असताना त्यांनी ना. रामराजे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला त्यांनी आळजापूर, ता. फलटण येथील एका खासगी कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. ना. रामराजे म्हणाले, सकाळपासून रात्रीपर्यंत जे लिटरवर असतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. फलटण तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शिवारात पाणी खळाळण्यासाठी मला नीरा देवधरचे काम पूर्ण करावयाचे आहे. यासाठी मला आमदार किंवा खासदार होण्याची गरज नाही. मी अपक्ष असतानाही जनतेच्या हिताची अनेक कामे केली आहेत. ज्यांना कोणाला सातार्‍यात खासदार व्हायचे आहे त्यांना होऊ द्या. आमच्या पाठीशी आमचे नेते खा. शरद पवार असल्याने आम्ही फक्त विकासाची भाषा बोलतो. असभ्य कधीच बोलत नसल्याचेही ना. रामराजे यांनी स्पष्ट केले.