Wed, Nov 14, 2018 20:52होमपेज › Satara › महिला अधिकार्‍याशी फोनवरून अश्‍लील संभाषण; एकास अटक

महिला अधिकार्‍याशी फोनवरून अश्‍लील संभाषण; एकास अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

पंचायत समिती फलटण येथील महिला अधिकार्‍याशी फोनवरून अश्‍लील संभाषण करून विनयभंग  केल्याप्रकरणी बरड, ता. फलटण येथील विलास शंकर आटोळे रा. बरड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी विलास शंकर आटोळे याने पंचायत समितीकडे अनुदानातून जनावरांची कडबा कुट्टी मशीनची मशीनची केली होती. याबाबतच्या प्रस्ताव मंजुरीबाबत त्याने पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्‍याकडून संबंधित महिला अधिकार्‍याचा मोबाईल नंबर घेतला.

यानंतर दि. 26 रोजी संबंधित महिलेचा पती कामानिमित्त परगावी गेल्यानंतर रात्री फोन करून अश्‍लील भाषा वापरून मनात लज्जा उत्पन्न होईल असे संभाषण केले. दि. 27 पती घरी परतल्यावर संबंधित महिला अधिकार्‍याने फोनवरील घडलेली घटना सांगितली. यानंतर फलटण शहर पोलिस ठाण्यात विलास आटोळे याच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार  त्यास  अटक करण्यात आली  आहे. 


  •