Sat, Nov 17, 2018 08:17होमपेज › Satara › मालेगाव खूनप्रकरण; दोन संशयित फलटणला जेरबंद

मालेगाव खूनप्रकरण; दोन संशयित फलटणला जेरबंद

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 11:06PMफलटण : प्रतिनिधी

मालेगाव, जि. नाशिक येथील परप्रांतीय डाळिंब व्यापारी पतीचा खून करून फरार झालेली पत्नी व तिच्या पहिल्या पतीस रमजानपुरा (मालेगाव) पोलिस व फलटण पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास फलटण बसस्थानकावर सापळा रचून अटक केली. मालेगाव (जि. नाशिक) येथे परप्रांतीय डाळिंब व्यापारी मोहंमद सज्जाद मोहमद बशीर यांचा 14 फेब्रुवारीला खून झाला होता. याप्रकरणी संशयित असलेली त्याची पत्नी नाजिया मोहंमद सज्जाद व तिचा पहिला पती मोहंमद आसिफ शेख जमील (रा. मुंबई) हे दोघे तेव्हापासून फरार होते. 

मोबाईल लोकेशनवरून त्यांचा माग काढल्यानंतर या दोघांना फलटण येथे शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांनी फलटण शहरात कोणाशी संपर्क साधला का? तिथून ते कुठे जाणार होते का? अजून कोण या घटनेत सामील आहे का? याचा तपास पोलिस घेत आहेत. दरम्यान, संशयितांना मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.