Thu, Jul 09, 2020 18:59होमपेज › Satara › महाबळेश्‍वरच्या जंगलात मद्यधुंद पार्टी करणार्‍या युवकांना दंड

महाबळेश्‍वरच्या जंगलात मद्यधुंद पार्टी करणार्‍या युवकांना दंड

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:42PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर

महाबळेश्‍वरपासून जवळच असणार्‍या लिंगमळाच्या घनदाट जंगलात वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी अलिशान मद्यधुंद पार्टीचा बेत उधळून लावला. उच्चभू्र वर्गातील 8 युवकांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिस व वन विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. 

लिंगमळा परिसरात रात्री उशिरा फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची दिवदमण पासिंगची (क्र.डी.डी. 03 के  0327, डी.डी. 03 जे 2444 व एम.एच. 16 बी.वाय. 3625) ही वाहने वाहनतळावर आढळून आली. पोलिसांनी महाबळेश्‍वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्सच्या पथकाद्वारे शोध घेतला. शोध घेत असताना लिंगमळा छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूच्या मोकळ्या घनदाट जंगल परिसरात हे पर्यटक शेकोट्या पेटवून थंडीची मजा लुटताना आढळले.

9 युवक व 2 युवती मद्य प्राशन करून बीभत्स नाच करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ आकाश महाबळ (वय 23, रा. मिरज), संभाजी गाडे (24), ऋषिकेश गाडे (24), शुभम जिने (24, सर्व रा. नगर), हर्षल पटेल (24), हेमचंद्र शहा (24), प्रियंक पटेल (25), उमंग पटेल (24) व चाँद पटेल सर्व रा. मुंबई) यांना ताब्यात घेतले.