Tue, Mar 19, 2019 09:41होमपेज › Satara › माणुसकी अजूनही जिवंत आहे...

माणुसकी अजूनही जिवंत आहे...

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 7:59PMरेठरे बु : दिलीप धर्मे 

समाजातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या,अडचणी,आणि व्यथा मांडण्याचे काम  दै.‘पुढारी’ने सातत्याने केले आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देत अनेक असाहाय्य लोकांना समाजाकडून काही ना काही मदत मिळावी व त्यांचा प्रश्‍न सुटावा ही अपेक्षा,आणि उद्देशही यात निश्‍चित राहीला आहे. गेली 30 वर्षे जगण्यासाठी धडपड करणारे पाटोळे दाम्पत्य  ‘त्यांना हवी मायेची उब’ हे वृृत्त दै.‘पुढारी’ मध्ये  दि.15 जून रोजी प्रसिद्व झाले आणि समाजातील दानशुर व्यक्तिंनी कराड येथील कॉटेजच्या वर्‍हांड्यात धाव घेतली.

मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पाटोळे दाम्पत्यांसाठी शेकडो हात सरसावल्याचे पाहून आजही समाजामध्ये सहकार्याची भावना जागृत असल्याचे दिसून येत आहे. कराड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील असलेले प्रभाकर आणि सुलभा हे वृध्द दाम्पत्य रोजीरोटीसाठी कराड येथील कॉटेजच्या वरांड्यात वास्तवास आहेत. ना त्यांना कोणाचा आश्रय ना आधार अशा अवस्थेत पोटासाठी ते लोकांकडून चार घास मागून घेवून दिवस ढकलत आहेत.मिळाले तर तो आपला दिवस,अन्यथा कधी त्यांना उपाशी राहावं लागते,असे दुदैवाचे जीणं आजही त्यांच्या नशिबी सुरू आहे.त्यांच्या जीवनाची कैफियत दै.‘पुढारी’त गेल्या महिन्यात प्रसिद्व झाली आणि समाज मन हेलावून गेलं.अनेकांनी फोनवरून विचारपुस करताना आपल्या भावना व्यक्त केल्याच शिवाय कॉटेजच्या वर्‍हांड्यात धाव घेवून त्यांना अंथरून पांघरूण,कपडे,आर्थिक तर काहींनी खाऊ स्वरूपात मदत देवू केली आहे. त्याठिकाणी लोकांनी मायेने व आस्थेने  त्यांची विचारपुसेही केली,हे पाहून आभाळा खाली एकट समजणार्‍या पाटोळे दाम्पत्यांना या समाजात आपले कोणी तरी आहे,या भावनेने त्यांच्या डोळ्यातील अश्रुंचा बांध फुटला. 

समाजा मध्ये मदत करणारे लोक आहेत.पण त्यांच्या पर्यत आम्ही पोहचू शकत नाही मात्र दै.‘पुढारी’ने आमचं जीणं समाजापुढे आणलं म्हणूनच ही मदत मिळाली असे सांगून पाटोळे दाम्पत्यांनी दै.पुढारीचे आभार मानले.