Sat, Jul 20, 2019 11:04होमपेज › Satara › साहित्यातील ‘राजकारण’; राजकारणातील ‘साहित्य’

साहित्यातील ‘राजकारण’; राजकारणातील ‘साहित्य’

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 9:44PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटणच्या साहित्य संमेलनाला यावेळी संयोजक तथा स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्यावरील बाजार समिती सभापती पदावरील अविश्‍वास ठराव आणि पहिल्यांदाच आ. शंभुराज देसाई यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकार्‍यांची उपस्थितीची किनार लाभली. त्यामुळे येथे साहित्यातील राजकारण व राजकारणातील साहित्य अनुभवायला मिळाले. 

पाटण तालुक्यातील जनतेने राजकारणच्या पलीकडचे साहित्य कधी पाहिलेलेच नाही. राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाचेच विक्रमबाबा मात्र गेल्या काही महिन्यांपासून गटांतर्गत दुरावा व बाजार समिती सभापती पदावर आलेला अविश्‍वास यामुळे ते थोडे प्रवाहातून बाजूला पडले हेही सत्य. आजवर मर्यादीत राजकारण व अधिकाधिक साहित्य अशी परंपरा होती. मात्र यावेळी भाजपचे अनेक मंत्र्यांना आमंत्रण दिले मात्र त्याला म्हणावासा तांत्रिक प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर मग सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शुभारंभला आ. देसाई व समारोपाला युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यामुळे तर साहित्यिक बाजूला मात्र राजकारण्यांच्या नजरा आपोआपच इकडे वळल्या. 

संमेलनाला काही राजकारण्यांनी  दांडी मारली तर आ. देसाई यांनी आपल्या समर्थक ताफ्यासह शुभारंभात संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. तर सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीने मग आपोआपच पाटणकर गटाचा मेळा भरला. भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी भाषणातून मार्मिक टिपण्णी  दिल्यानंतर विक्रमबाबांनी समारोपाच्या भाषण केले.