Sat, Apr 20, 2019 16:42होमपेज › Satara › आश्‍वासनांची पुर्तता झाली नाही तर प्रकल्पग्रस्तांच्या रोषालाही तयार रहा

आश्‍वासनांची पुर्तता झाली नाही तर प्रकल्पग्रस्तांच्या रोषालाही तयार रहा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

साठ वर्षांनंतर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. यातही श्रेयवाद व कलगीतुरे रंगले आहेत. मात्र पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता झाली नाही तर प्रकल्पग्रस्तांच्या रोषालाही श्रेय घेण्यास पुढे येणार्‍या नेत्यांनी सामोरे जावे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.  गेल्या साठ वर्षांपासून आजही कोयना प्रकल्पग्रस्तांचे बहुतांशी प्रश्‍न प्रलंबित असल्याचा दावा हिच प्रकल्पग्रस्त मंडळी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने संबंधितांचे पुनर्वसन, महसुली गावे, गावठाण, शासकीय नोकर्‍या, नागरी सुविधांचे प्रश्‍न हे तातडीने मार्गी लावण्यासाठी येथे आजवर अनेक आंदोलने झाली. 

नुकतेच कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे नेते  डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील तब्बल तेवीस दिवस याच प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केले. वास्तविक कोणत्याही राजकीय नेतृत्व अथवा पक्षा शिवाय हे अंदोलन झाले होते. पहिल्या टप्प्यात प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी व विरोधी नेत्यांनीही आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. अनेक दिवसांच्या अंदोलनानंतर मग त्या-त्या गट अथवा पक्षाच्या अंतर्गत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे मान्यवर नेत्यांनी केवळ औपचारिकता म्हणून या आंदोलनाला भेट दिली. पाठिंबा व नेहमीप्रमाणे आश्‍वासने त्यांनी दिली. दरम्यान मुख्य प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी व सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या  मध्यस्थीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांची बैठक झाली. 

वास्तविक या अंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवरच ही तातडीची बैठक बोलावली होती. त्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह केवळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनाच बोलाविल्याचे अधिकृत पत्रही देण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.  त्यामुळे जर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत ही मंडळी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील आणि आपापसात भांडणे लावून या प्रश्‍नांना बगल दिली जात असेल ते प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर गंभीर नाहीत असेच म्हणाले लागेल. 
 

 

 

tags ; patan,news,Koyna, project,Affected,pending, demand,


  •