Wed, Nov 21, 2018 23:58



होमपेज › Satara › कोयना धरण ६० टक्क्यांवर

कोयना धरण ६० टक्क्यांवर

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:29PM



पाटण : प्रतिनिधी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, महाबळेश्‍वर, नवजासह परिसरात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात गेल्या चोवीस तासांत सुमारे 4 टीएमसी पाण्याची भर पडली. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणीसाठा 63 टीएमसीपर्यंत पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून कोयना धरणात सरासरी प्रतिसेकंद 53 हजार 209 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणी साठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 58 टीएमसी इतका आहे. धरणातील 
पाणी उंची 2 हजार 122.1 फूट, जल पातळी 646.811 मीटर इतकी झाली आहे. 

शुक्रवार सायंकाळपासून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात 3.60 टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठ्यात 3.3 फूट वाढ झाली आहे. 1 जूनपासून आत्तापर्यंत कोयना धरणात सुमारे 36.44 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गुरूवार सायंकाळी पाच ते शुक्रवार सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान कोयना येथे 85 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा 103 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 75  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.