Tue, May 21, 2019 04:32होमपेज › Satara › विचित्र अपघातामुळे पसरणी घाट जाम; वाहतूक सुरळीत(Video) 

विचित्र अपघातामुळे पसरणी घाट जाम; वाहतूक सुरळीत(Video) 

Published On: Apr 20 2018 1:37PM | Last Updated: Apr 20 2018 1:47PMभिलार : वार्ताहर 

वाई तालुक्यातील पसरणी घाटात शुक्रवारी सकाळी पोकलॅन घेऊन येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला त्यामुळे ट्रक मागून येणाऱ्या दोन वाहनांना धडकला. घाटातील बुवासाहेब मंदिर ते नागेवाडी फाट्याच्या दरम्यान हा अपघात झाला.यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातानंतर तब्बल 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. 

या अपघातामुळे घाट जाम झाला. यामुळे वाहने अडकून पडल्याने 5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, हा अपघात झाला त्यावेळी पोलीस घटनास्थळी लवकर पोहचू शकले नाही. त्याचवेळी पाचगणीला जात असणारे आमदार मकरंद पाटील यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघात ग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतरही वाहतूक कोंडी कमी झाली नव्हती. त्यानंतर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

Tags : Pasarani Gha, Traffic Jam, Accisent, Satara