Tue, Mar 26, 2019 22:39होमपेज › Satara › व्यसनाला जीवनातून हद्दपार करा

व्यसनाला जीवनातून हद्दपार करा

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 8:24PM

बुकमार्क करा
परळी : वार्ताहर

व्यसनाला आपल्या जीवनातून हद्दपार केले पाहिजे. निर्व्यसनी राहणे हा एकमेव मार्ग आहे. व्यसन न करण्याचा व्यसनाला प्रतिष्ठा नको तर त्याला बदनाम केले पाहिजे. यासाठी शालेय जीवनापासून आपल्या सभोवताली कोण व्यसन करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त केले पाहिजे. मी व्यसन करणार नाही आणि कोणालाही करु देणार नाही, असा दृढ निश्‍चय केला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शैला दाभोलकर यांनी येथे केले.

व्यसन मुक्तीच्या प्रबोधन रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ‘द’ दुधाचा दारुचा नव्हे, दारुची आस गळ्याला फास,  दारु नको दूध प्या, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी न्यू इयर, गुटखा नाही खाणार, दारु नाही पिणार, एक दोन तीन चार, व्यसनाचा हद्दपार, अशा घोषनांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी वीरमाता कालिंदा घोरपडे, किशोर काळोखे, आबा लाड, रिना पिंपळे, विकास कारंडे, दिपक पिंपळे, राहुल भोसले, रामदास पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. शैला दाभोळकर म्हणाल्या, विधायक, सामाजिक उपक्रम राबविले गेले पाहिजेत. 

वीर माता कालिंदा म्हणाल्या, शहीद संतोष यांचे विचार, आचार आजच्या युवकांना प्रेरणा देणारे आहेत. त्याने कधीही व्यसनाला थारा दिला नव्हता. देशप्रेम आणि सामाजिक कार्यात युवकांनी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. शिक्षणाबरोबरच सदृढ शरीर असले पाहिजे. दरम्यान, कालिंदा घोरपडे यांच्या निवासस्थानापासून पोगरवाडी मानेवाडी, भोंदवडे, काळोशी, अंबवडे, करंजे, कूस बद्रुक, बनघर, वाघवाडी, परळी, गजवडी, सोनवडी, कारी, आंबळे अशी दुचाकीची मशाल घेऊन रॅली काढण्यात आली.  आंबळे येथे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन रॅलीची सांगता केली.