Sat, Nov 17, 2018 23:08होमपेज › Satara › रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू 

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू 

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:39PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर 

परळी खोर्‍यातील लूमणेखोल येथील असलेला व सध्या मुंबई चारकोप येथे राहणार्‍या 26 वर्षीय तरुणाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री मुलुंड येथे घडली. अक्षय महेंद्र भंडारे असे त्याचे नाव आहे. अक्षय महेंद्र भंडारे हे कामावरून घरी जात असताना दादर (मुंबई) मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमधून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी  त्यांच्या पार्थिवावर 
चारकोप येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उरमोडी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष वसंत भंडारे यांचे नातू होते.