Sun, Jul 21, 2019 00:15होमपेज › Satara › पाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार 

पाचगणीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार 

Published On: Dec 19 2017 8:56PM | Last Updated: Dec 19 2017 8:37PM

बुकमार्क करा

पाचगणी : वार्ताहर 

पाचगणी येथील माऊंट केस्टल हॉटेलसमोर दोन दुचाकी स्वारांची समोरसमोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्‍यू झाला. 

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार, मोटारसायकल क्रं एम एच ११ बी यु ८५३३ व मोटार सायकल क्रं जी ए १२ बी ओ ७९८ यांची समोरा समोर धडक झाली. ही धडक जोरात झाल्‍याने धुकर आवडे व ज्योती आवडे हे दांपत्य जखमी झाले तर विजय जगन्नाथ कांबळे रा.दाडेघर हा मयत झाला आहे .