Thu, Jul 18, 2019 16:44होमपेज › Satara › वडी येथील युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

वडी येथील युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 10:49PMऔंध  : वार्ताहर

वडी, ता. खटाव येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकाविरोधात पोक्सोअंतर्गत औंध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत औंध पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 24 जून रोजी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सूरज ऊर्फ बाबू सुभाष येवले हा संबंधित अल्पवयीन मुलीच्या घरी गेला व तू सातारा येथे कॉलेजला का अ‍ॅडमिशन घेतेस, असे म्हणून संबंधित अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन दमदाटी केली.

या घटनेची फिर्याद अल्पवयीन मुलीने औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. याप्रकरणी सूरज ऊर्फ बाबू सुभाष येवले रा. वडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप सूरज येवले यास अटक करण्यात आली नाही. अधिक तपास सपोनि सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर अतिग्रे करीत आहेत.