होमपेज › Satara › प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवा : आर. एन. लढ्ढा

प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवा : आर. एन. लढ्ढा

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:50PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

प्रलंबित व वादपूर्व अशी दोन प्रकारची एकूण 1 लाख प्रकरणे  राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आली आहेत. पक्षकारांची  आपली जास्तीत जास्त प्रकरणे त्यामध्ये सामोपचाराने   मिटवावीत, असे आवाहन प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी केले.

येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर यांच्यासह न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने जिल्हा न्यायालयात 21 पॅनल तयार करण्यात आले आहेत.  राष्ट्रीय लोकअदालतीत सर्वांनीच उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. पक्षकारांनी या  लोकअदालतीचा लाभ घेवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावेत, असे विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर यांनीही आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  न्यायालयातील सर्व प्रकारची प्रलंबित प्रकरणे म्हणजे सर्व दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाई  इ. प्रकरणे तडजोड करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. यावेळी वकील, न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.