Tue, Jun 02, 2020 00:43
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › राजाचे कुर्ले येथील एकाची आत्महत्या

राजाचे कुर्ले येथील एकाची आत्महत्या

Published On: Jan 21 2019 1:38AM | Last Updated: Jan 21 2019 12:00AM
पुसेसावळी : वार्ताहर 

राजाचे कुर्ले, ता. खटाव येथील विक्रम प्रकाश माने या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रकाश माने यांनी पुसेसावळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

विक्रम हा रविवारी रात्री 3 च्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. यानंतर अधिक तपास केला असता प्रकाश माने यांच्या गोठ्यात विक्रमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.