Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Satara › दारूची चोरटी वाहतूक करताना एक ठार

दारूची चोरटी वाहतूक करताना एक ठार

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:53PMकुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील कुडाळ-सर्जापूर रस्त्यावर सोमवारी पहाटे दुचाकीवरून दारूची वाहतूक करताना गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दारू विक्रेता ठार झाला. दरम्यान, तालुक्यातील बेकायदा दारू विक्रीला लगाम घालण्याची मागणी जनतेकडून होत आहे. 

मधुकर सपकाळ (वय 50) असे ठार झालेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. सपकाळ हे सातार्‍यावरून कुडाळमार्गे दुचाकीवरून पानसला निघाले होते. कुडाळ-सर्जापूर रोडवर असलेल्या भिसे वस्तीनजीक आल्यानंतर तीव्र उतारावर सपकाळ याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी लगतच्या गटारात जाऊन आदळली. या अपघातात सपकाळ यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे अपघात झाल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. मात्र, तासाभरानंतर दुचाकी पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना नागरिकांनी दुर्घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सपकाळ यांचा मृतदेह मेढा येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

Tags : Satara, One, killed, while, transporting, illegal, alcohol