Sun, Apr 21, 2019 00:27होमपेज › Satara › कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:49PMदहिवडी : प्रतिनिधी

येथील फलटण रस्त्यावरील तिकटण्याजवळ दुचाकी व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दहिवडीतील शबनम धाब्याचे मालक इन्नूस ऊर्फ राजाभाऊ हमीद शेख जागीच ठार झाले.

शबनम धाब्याचे मालक इन्नूस शेख रविवारी सायंकाळी दहिवडी-फलटण रस्त्यावर धाब्याकडे चालले होते. यावेळी समोरून येणार्‍या स्विफ्ट  कारने (एमएच 12 एनबी 4547) त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कुटरचा चक्काचूर झाला. तसेच स्वीफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत दहिवडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.