Wed, Nov 21, 2018 04:05होमपेज › Satara › अपघातात दुचाकीस्वार ठार

अपघातात दुचाकीस्वार ठार

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:28PM

बुकमार्क करा

भुईंज : वार्ताहार

पुणे-बेेंगलोर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत हॉटेल अथर्वनजीक सातारकडे जाणार्‍या दुचाकीला ( क्र. एमएच 11 बीई 9139) पाठीमागून येणार्‍या कारने (क्र. एमएच 12 एमबी 0276)  ठोकर दिल्यामुळे दुचाकीस्वार दत्तात्रय छबन शिंदे (वय 28, रा. बोपेगाव, ता. वाई) हा युवक ठार झाला, तर पाठीमागे बसलेला गणेश गोकुळ कानडे (रा. बोपेगाव, ता. वाई) हे गंभीर जखमी झाले. 

कारचालकास पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास स.पो.नि. बाळासाहेब भरणे व हवालदार मुंगसे, आनंदा भोसले करीत आहेत. 

उपचाराअभावी आणखी किती बळी?

महामार्गावर अत्याधुनिक सुविधा देणारे रुग्णालय उभारा किंवा भुईंजचे मंजूर ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करा, या मागणीकडे जिल्हा प्रशासन कधी गांभीर्याने पाहणार? आणखी किती जणांचे असे बळी जाणार? असे सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केले आहेत.