Fri, Nov 16, 2018 00:17



होमपेज › Satara › शिवज्योत आणताना युवकाचा मृत्यू

शिवज्योत आणताना युवकाचा मृत्यू

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 11:05PM



भुईंज : वार्ताहर

शिवनेरी गडावरून शिवज्योत आणताना चाकण (जि. पुणे) येथे झालेल्या अपघातात पाचपुतेवाडी, (ता. वाई) येथील युवक ठार झाला, तर इतर दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाचपुतेवाडीचे युवक शिवज्योत आणण्यासाठी टेम्पो व सोबत एक दुचाकी घेऊन शिवनेरी किल्ल्यावर  गेले होते. शिवज्योत घेऊन परत येत असताना चाकण येथे ज्योतीसमवेत असणार्‍या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या आयशर टेम्पोने जोरदार ठोकर दिल्याने दुचाकीचालक स्वप्निल अरविंद चव्हाण (वय 24) हा टेम्पोच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला तर पाठीमागे बसलेल्या अमर चंद्रकांत पाचपुते (वय 24) याच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातात  विनायक रामचंद्र गोळे वय 26 हा किरकोळ जखमी झाला आहे. 

मयत स्वप्नील हा हिंजवडी, पुणे येथे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीस असून आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर पळून जाणार्‍या आयशर टेम्पोचा पाठलाग करून तो पकडण्यात आला.

 

Tags : satara,  Bhuinj news, accident,