Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Satara › मोटारसायकल अपघातात एक ठार

मोटारसायकल अपघातात एक ठार

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:20PMवाई : प्रतिनिधी

सुरूरकडून वाईकडे येणारी मोटारसायकलला (एम.एच. 27 सीई 6751) अपघात होऊन मोटारसायकलस्वार प्रफुल्ल विठोबा भगत (वय 21, रा. निवसा अमरावती) हा जागेवर ठार झाला, तर पाठीमागे बसलेला त्याचा मित्र निशांत वासुदेव इंगळे (23, रा. शिवर अकोला) हा जखमी झाला. 

रविवारी सकाळी साडेसहा वाजता भरधाव येणार्‍या मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटल्याने  मोटारसायकल शहाबाग फाटा येथे रस्त्याकडेला टाकलेल्या ग्रीटच्या ढिगार्‍यावर चढून तेथील दगडाच्या ढिगार्‍यावर आपटली. यामध्ये भगत यांच्या डोक्यास जबर मार लागला.