Tue, May 21, 2019 13:09होमपेज › Satara › साताऱ्यात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

साताऱ्यात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

Published On: Sep 03 2018 11:52AM | Last Updated: Sep 03 2018 11:52AMसातारा : प्रतिनिधी

सैदापूर, ता. सातारा येथील आनंदा ज्ञानु इंगळे यांचा सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू झाल्याने मृत्यू झाला. यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आनंदा इंगळे हे काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना  ३१ ऑगस्ट रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  इंगळे यांच्यावर उपचार केले असता नेमके निदान समजून आले नाही. त्यामुळे रविवारी रात्री त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे म्हंटले आहे. 

जानेवारी महिन्यापासुन शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या २१६ संशयित रुग्णांपैकी २४ रुग्ण हे स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर ६ स्वाईनफ्लुच्या रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.