होमपेज › Satara › अपहरण, बलात्कार प्रकरणी एकास अटक

अपहरण, बलात्कार प्रकरणी एकास अटक

Published On: Mar 04 2018 1:39AM | Last Updated: Mar 03 2018 11:29PMशाहूपुरी : वार्ताहर

शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहारण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अल्तमास नजीर मुजावर (वय 24, रा. तेलीखड्डा, नकाशपुरा) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

दि. 1 मार्च रोजी मैत्रिणीकडे जाते असे सांगून ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी न परतल्याने आई, वडील व नातेवाइकांनी तिची शोधाशोध केली, मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी संशयित अल्तमास मुजावर याच्या विरोधात मुलीच्या अपहरणाची तक्रारी दिली. तक्रार दिल्यानंतर 24 तासांच्या आतच पोलिसांनी मुजावर याला गजाआड केले. संबंधित मुलगी त्याच्याजवळच असल्याचे आढळून आले. 

मुजावर हा संबंधित मुलीला पाचवड येथील एका शाळेत घेऊन गेला असल्याचे समोर आले आहे. यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर मुजावर याने बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले.