Tue, Mar 26, 2019 21:56होमपेज › Satara › सज्जनगडावरील कासव तोडफोड प्रकरणी एकास अटक

सज्जनगडावरील कासव तोडफोड प्रकरणी एकास अटक

Published On: Jan 12 2018 12:07PM | Last Updated: Jan 12 2018 12:07PM

बुकमार्क करा
परळी: वार्ताहर 

सज्जनगडावर दहशत माजवत समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिरासमोरील पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड गुरुवारी करण्यात आली होती. या कासवाचे दोन पाय चोरून नेहणाऱ्या लक्ष्मण कुमार मनवे (वय, 35 रा. सज्जनगड ) याला गुरुवारी रात्री उशिरा सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिर परिसरात बुधवारी रात्री लक्ष्मण मनवे याने खूप काळ दहशत माजवित मंदिरासमोर असणाऱ्या पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड करून त्याचे मागील दोन पाय चोरून नेले होते. त्यानंतर त्याने त्याचा मोर्चा समाधी मंदिर पाठीमागे असणाऱ्या धाब्याचा मारुती मंदिर रस्त्याकडे वळवला आणि या मार्गावरील ट्यूबलाईटचीही तोडफोड केली. हा यावरच समाधानी न राहता त्याने परिसरात असणाऱ्या गटारांचीही तोडफोड केली. गुरुवारी पहाटे मंदिरात येणाऱ्या समर्थभक्त आणि ग्रामस्थ यांच्या निदर्शनास ही घटना आली. 

बुधवारी रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चेतन मचले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सज्जनगड येथे धाव घेत या प्रकरणाची माहिती घेत आरोपी लक्ष्मण मनवे याला अटक केली आहे. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार सावंत करित आहेत.