Sun, Nov 18, 2018 20:08होमपेज › Satara › बलात्कारप्रकरणी ऊस तोडणी कामगारास अटक 

बलात्कारप्रकरणी ऊस तोडणी कामगारास अटक 

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:22PMकोरेगाव : प्रतिनिधी

चिमणगाव येथील जरंडेश्‍वर साखर कारखान्याच्या समोरील बाजूस असलेल्या माळावर ऊस तोडणी कामगारांच्या वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच वस्तीतील ऊस तोडणी कामगार ज्ञाना ऊर्फ ज्ञानेश्‍वर आसाराम टकले (वय 22) याला पोलिसांनी अटक केली.

न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवस पोलिस कोठडी दिली. संबंधित अल्पवयीन मुलगी ही कुटुंबीयांसह ऊस तोडणीच्या कामासाठी बीड जिल्ह्यातून आलेली आहे.