Wed, Jan 23, 2019 00:41होमपेज › Satara › सातारा : फुटक्या तळ्यात बुडून एकाचा मृत्यू (Video)

सातारा : फुटक्या तळ्यात बुडून एकाचा मृत्यू (Video)

Published On: Apr 08 2018 12:27PM | Last Updated: Apr 08 2018 1:00PMसातारा: प्रतिनिधी

शहरातील सोमवार पेठेतील फुटक्या तलावात आज एकाचा बुडून मृत्यू झाला. सुमित शेखर आगे ( वय 13) असे मृताचे नाव असून तो जंगीवाडा येथील रहिवासी होता. 

सुमित नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी तलावात गेला होता. मात्र पोहताना त्याला दम लागल्याने तो बुडाला. तळ्यावर असणाऱ्या काही मुलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पाण्याच्या बाहेर काढले असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. 

Tags : Drown, Lake, Satara,Crime