Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Satara › भरतीला गेलेल्या तरुणांची गाडी कालव्यात बुडाली; एक बेपत्त्ता (Video)

भरतीला गेलेल्या तरुणांची गाडी कालव्यात बुडाली; एक बेपत्त्ता (Video)

Published On: Dec 14 2017 9:06AM | Last Updated: Dec 14 2017 9:09AM

बुकमार्क करा

फलटण :  प्रतिनिधी 

भरतीसाठी गेलेल्या मुलांची क्रुजर नीरा उजव्या कालव्यात पलटी झाली. भरती प्रशिक्षण रद्द झाल्याने महाबळेश्वर येथे नातेवाईकांना भेटून माहूरला (नांदेड) येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडीमध्ये सातजण होते. त्यातील सहाजण पोहून बाहेर पडले मात्र एक जण वाहून गेला आहे.  कचरू दत्ता गिरेवाड रा.चितगिरी ता.भोकर जी .नांदेड (वय २४) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, कालव्यातून अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यात आली आहे. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. चालकाला अंदाज न आल्याने नीरा उजवा कालव्यात क्रुजर गाडी नं.एमएच 26 एफ  2852 पलटी झाली. गाडीतील सातपैकी सहा जण पोहून बाहेर पडले. मात्र एक जण गाडीसह पाण्यात अडकला होता. मध्यरात्रीपासून पोलीस व पोलीस मित्र या एकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते.

आज सकाळी गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली मात्र त्यात तरुण नव्हता. बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध पोलिस, पोलिस मित्र आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरु आहे.

व्हिडिओ - यशवंत खलाटे