Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Satara › सातारा : वाळू चोरीप्रकरणी मसूरच्या एकाला शिक्षा

सातारा : वाळू चोरीप्रकरणी मसूरच्या एकाला शिक्षा

Published On: Mar 21 2018 2:38PM | Last Updated: Mar 21 2018 2:38PMकराड : प्रतिनिधी 

मसूर परिसरात कृष्णा नदीतून तीन ब्रास वाळूचा बेकायदा उपसा करून विक्रीसाठी वाळू चिपळूणकडे नेणाऱ्या मसूर (ता. कराड) येथील अनिल लक्ष्मण कांबीरे याला सहा महिन्यांच्या कारावासासह एक हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या. ऐ. जे. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली असून सरकार पक्षातर्फे सूर्यकांत पोवार यांनी काम पाहिले.

ही घटना 7 नोव्हेंबर 2010 रोजी घडली होती. चिपळूणच्या तत्कालीन तहसीलदार श्रीमती जयमाला मुरूडकर या चिपळूण तालुक्यातील गोवळपेठ गावातून जात होत्या. त्यावेळी एका ट्रकमधून वाळू उतरली जात होती. त्यावेळी तहसिलदारांनी चौकशी केला असता संबंधित वाळू शिवडे (ता. कराड) येथून आणल्याचे उघड झाले होते. तसेच कांबीरे यांच्याकडे उत्खनन आणि वाळू वाहतुकीचाही परवानाही नव्हता. त्यामुळे कांबीरे याने वाळू चोरून आणल्याचे समोर आले होते.

समीर देसाई या मंडल अधिकाऱ्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा तपास पुढे उंब्रज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. उंब्रजचे तत्कालीन हवालदार एल. आर. शिंदे यांनी तपास पूर्ण करत याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 
 

Tags : Satara News, Illegal Sand Buisness,Imprisonment, Crime, Court,