Wed, May 22, 2019 22:45होमपेज › Satara › सातारा: ट्रकच्या भीषण अपघात एक ठार (Video)

सातारा: ट्रकच्या भीषण अपघात एक ठार (Video)

Published On: Feb 10 2018 4:26PM | Last Updated: Feb 10 2018 4:26PMलिंब : वार्ताहर 

पुणे-बेंगळुरु महामार्गावरील सातारा शहाराजवळील वाढे फाटा परिसरात झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात एक जण ठार तर एकजण गंभीर  जखमी झाला आहे. यात एका ट्रकचा चक्काचुरा झाला आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील मध्य दुभाजकातील झाडांना पाणी सोडत असलेल्या ट्रक (एमएच ११ एसी ५०६५ ) ला पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या  ट्रकने ( एमएच ११ एल २०४१ )  मागून जोरदार धडक दिली. यात ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारदरम्यान काशिम अब्दुल मुजावर वय (२५  रा. वर्धनगड ता. खटाव ) मयत झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.