Thu, Jul 18, 2019 10:46होमपेज › Satara › सातारा : कराड येथे दोघांना ट्रकने चिरडले; एकाचा मृत्यू

सातारा : कराड येथे दोघांना ट्रकने चिरडले; एकाचा मृत्यू

Published On: Apr 08 2018 12:25PM | Last Updated: Apr 08 2018 12:25PMकराड  : प्रतिनिधी

येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्य दोघांना ट्रकने चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सुनिल आनंदा माने असे मृताचे नाव आहे तर दशरथ सुर्यवंशी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कराडच्या सह्याद्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माने व सुर्यवंशी हे दोघे मित्र आहेत. माने हे गुरूवार पेठेत तर सुर्यवंशी हे बुधवार पेठेत वास्तव्यास आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ते दोघेही सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जातात. रविवारीही ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास ते दोघेही चालत कराडमधील दत्त चौकात आले होते. यावेळी अचानकपणे एका भरधाव वेगातील ट्रकने त्या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत माने यांच्या डोक्याला, हाताला तसेच पायाला गंभीर दुखातप झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुर्यवंशी हे जखमी झाले आहेत. 

या अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे. मात्र सकाळी सातच्या सुमारास अपघात होऊनही एकही प्रत्यक्षदर्शी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिसांना मिळाला नव्हता. तसेच अपघातानंतर ज्या ट्रकने धडक दिली, त्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले आहे. या ट्रकसह चालकाचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Tags : Accident, Dead, Injured, karad, Satara