होमपेज › Satara › पाटण : टँकर दरीत कोसळून एकजण ठार

पाटण : टँकर दरीत कोसळून एकजण ठार

Published On: Apr 25 2018 1:59PM | Last Updated: Apr 25 2018 1:59PMमारूल हवेली (पाटण) : वार्ताहर

चिपळूण - पंढरपूर राज्यमार्गावरील उरूल ( ता. पाटण, जि. सातारा) घाटात खोल दरीत टँकर कोसळून एक जण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवार, २५ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडला. विकास संजय कदम (वय २७, रा. लांडगेवाडी ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर चालकाने टँकरमधून उडी टाकल्याने तो बचावला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावरील पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरूल घाटात चिपळूणहून नगरच्या दिशेने टँकर ( क्र. एम.एच.10  ए. डब्लू.7387) निघाला होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने तो खोल दरीत कोसळला. या अपघात विकास कदम हा जागीच ठार झाला. हा टँकर कवठेमहांकाळ येथील श्री व्यंकटेश्वरा रोडलाईन्स कंपनीचा आहे.

केबीनमध्ये अडकलेला विकास कदम याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात चार तास प्रयत्न करूनही पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे क्रेनच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. विकास हा टँकर मालकाचा मुलगा असून तो फिरण्यासाठी टँकरमधून आला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे