Sat, Apr 20, 2019 18:04होमपेज › Satara › महिलेवर बलात्कार; पाडळीतील एकावर गुन्हा

महिलेवर बलात्कार; पाडळीतील एकावर गुन्हा

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:29PMकराड : प्रतिनिधी

शेतात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करून एक जण पळून गेला. शनिवारी (दि. 24)  दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पाडळी (ता. कराड) येथील एकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिफ मुजावर (रा. पाडळी) असे बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, एकटी राहत असलेली अविवाहित महिला शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाठीमागून अचानक आलेल्या एकाने संबंधित महिलेला मिठी मारली. तिचे तोंड दाबून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करून तेथून पळून गेला. त्यानंतर संबंधित महिला रडत गावात आल्यानंतर हा प्रकार लोकांना समजला. दुपारच्या सुमारास पाडळी येथील असिफ मुजावर हा पळत पाडळी बाजूस गेल्याचे काहींनी पाहिले व त्यानंतर संबंधित महिला रडत घरी आल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे असिफ मुजावर याने महिलेवर बलात्कार करून पळून गेल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत.